निराधारांना आधार, निरंजन संस्थेकडून ३०० अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व
बीड : पुणे येथील निरंजन सेवाभावी संस्थेने तालुक्यातील मातृ पितृ छत्र हरपलेल्या निराधार ३०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. या विद्यार्थ्यांना एक वर्षभर पुरतील एवढे दर्जेदार शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
ज्या समाजात आपण वाढलो त्या समाजासाठी काम करण्याची आपली जबाबदारी आहे ही वागणूक बालपणीच आम्हाला मिळाली होती. शिक्षणामुळे माणूस आयुष्यातील कोणतेही ध्येय गाठू शकतो. त्यामुळे केवळ आर्थिक परिस्थितीमुळे किंवा मातृ पितृ हरपल्याने शिक्षणापासून ही बालके वंचित राहु नये म्हणून गेल्या दहा वर्षापासून निरंजन सेवाभावी संस्था महाराष्ट्रातील १५०० मुलांना शिक्षणासाठी पाठिंबा देत आहे.
या मदतीचाच एक भाग म्हणून ऊसतोड मजुरांचा व नेहमी कमी प्रजन्यवृष्टी होणारा तालुक्यातून आम्ही अनाथ ३०० विद्यार्थी निवडून त्यांचे शिक्षण अर्धवट राहु नये म्हणून हा उपक्रम करत असल्याचे डॉ नवनीत मानधनी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले. या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठिंबा देऊन उद्याचे उज्ज्वल नागरिक ते घडतील अशी आशा व्यक्त केली.
दत्ता देशमुख यांनी आपले मत व्यक्त करतांना असे उपक्रम ही पुण्याची निरंजन सेवाभावी संस्था करते हे अत्यंत अभिनंदनीय आहे अशा गरजू विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक मदत करण्यापेक्षा त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांना संस्था खूप मोठा आधार देत आहे. शैक्षणिक आधार बरोबर सामाजिक कायार्ची बीजे देखील त्यांच्यामध्ये रुजवत आहे, अशा संस्थांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहु असे सांगितले .
जयेश कासट म्हणाले, शहरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची कमतरता नसते, परंतु दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे अत्यंत कष्टाने शिक्षण पूर्ण करावे लागते.
दुष्काळग्रस्त ,आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील मुलांना अनेकदा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेणे शक्य होत नाही.त्यांना मदत देणे गरजेचे आहे.आणि माझ्या तालुक्याचा ऊसतोड मजूर कलंक पुसण्यासाठी आमचा हात लागत असून माझे निरंजन सेवाभावी संस्थेतील सहकारी माझ्या एका शब्दावर कुठलेही कार्य करण्यास तयार होतात त्यांचे देखील त्यांनी आभार मानले.
यावेळी सचिव CA दुर्गेश चांडक यांनी आपले मत व्यक्त करतांना असे सांगितले की महाराष्ट्रातील गरजू १५०० विद्यार्थ्यांचे निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने पालकत्व घेतले जाते व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते. यंदाचे उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे.
भविष्यात ५० शाळा डिजिटल करण्यासोबतच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील आम्ही करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाहिली शिरूर कासार येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत याच चालू वर्षात दोन लाख रुपये खर्चून R.O.फिल्टर पाणपोई केली तर दुसरी मागील महिन्यात पुणे येथील महानगर पालिकेच्या शाळेत अडीच लाख रुपये खर्चून एक R.O.फिल्टर अद्यावत पाणपोई केली आहे. तसेच भविष्यात १५०० विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा संस्थेचा मानस आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता देशमुख,बालरोग तज्ञ हनुमंत पारखे, गटविकास अधिकारी महादेव जायभाये, निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नवनीत मानधनी,CA सचिव दुर्गेश चांडक, तथा सामाजिक कार्यकर्त्या भीमाबाई कासट यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
मराठवाड्यातील २०० गरजू विद्यार्थ्यांना पुण्यातील कार्यक्रमात शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच बीड, अहमदनगर, रायगड, राजगड, तोरणं, मुळशी, तिकोना, तुंग, लोहगड आणि पौड परिसरातील गांवांमधील गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व घेण्यात आले आहे. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि. पुणे यांनी उपक्रमाला मोठे सहकार्य केले.
तसेच तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे, अनुराग धूत, नरेंद्र फिरोदिया, प्रवीण बजाज, महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे, यू.व्ही फाउंडेशन पुणे, मनीष मुंदडा ठाणे, विनीत तोष्णीवाल कोल्हापूर, महेश नागरी मल्टीस्टेट को-आॅप क्रेडीट सोसायटी लि.पुणे, राजेश कासट, श्यामसुंदर कलंत्री, गोविंद सारडा, भागीरथ तापडिया ट्रस्ट, पुणे यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी छत्रपती संभाजी राजे यांच्या अत्यंत जवळचे विराज तावरे, स्वप्नील देवळे,CA दुर्गेश चांडक, मुकेश माहेश्वरी, अहमदनगरचे अतुल डागा, CA विशाल राठी, निरंजनचे समन्वयक जीवन कदम यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन युवराज सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक अभय जाजू यांनी केले आभार प्रदर्शन वैभव लामतुरे यांनी केले.
0 Response to "निराधारांना आधार, निरंजन संस्थेकडून ३०० अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व"
Post a Comment