एकमेका सहाय्य करू २: बुफोनिड भैकेर आणि क्लोरोगोनियम शैवाल
नेहमीपेक्षा वातावरणात बराच बदल झाला की, तो बदल अनेक प्रजातींच्या जीवावरही बेततं. विशेषतः पिल्लांच्या बाबतीत ही शक्यता जास्ती असते. उदा. बुफोनिड बेडूकांच्या नवजात पिल्लांमध्ये अजून ज्यांना पायही नीट फुटलेले नाहीत आणि शेपूटही खुंटलेली नाही अशी भैकेर अवस्था असते. अशा अवस्थेत पाण्याचे तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले, तर अस्वस्थ व्हायला सुरुवात होते.
तापमान वाढेल तसे पाण्यात विरघळलेले वायू उडून जायला लागतात. 15 अंश तापमानाला 11 मिलिग्रॅम/लिटर असणारा ऑक्सिजन 40 अंशाला जेमतेम 7 मिग्रॅ/लि इतका कमी होतो. तर कर्ब वायूही 200 वरून 100 मिग्रॅ/लि इतका होतो. त्याचा परिणाम क्लोरोगोनियम या हिरव्या शैवालावरही होतो.
प्रत्येक जीवाची तापमान सहन करण्याची काही कमाल मर्यादा असते. अशा वेळेला बुफोनिड भैकेरच्या अंगावर क्लोरोगोनियम आपल्या पातळ लांब केसांसारख्या कशा हालवत हालवत स्वार होतात. भैकेरना सावली, गारवा आणि ऑक्सिजन मिळतो तर क्लोरोगोनियम शैवालाला भैकेरचा आधार आणि कर्ब वायू मिळतो. दोघांना संकटात परस्परांचा आधार, सहकार्य आणि साथ मिळते.
एकमेका सहाय्य करू...
परिसरातील पाण्याचे वाढता तापमान
कर्ब वायू उडून जाई तसाची वायू प्राण
भैकेर असो वा शैवाल होत जाती हैराण
जवळ येऊन एकमेका देती जीवनदान
- विनय रमा रघुनाथ
0 Response to " एकमेका सहाय्य करू २: बुफोनिड भैकेर आणि क्लोरोगोनियम शैवाल"
Post a Comment