एकमेका सहाय्य करू १: पोपट आणि फळझाडे

एकमेका सहाय्य करू १: पोपट आणि फळझाडे



पोपट पक्ष्यांमध्ये हुशार. त्याचा मेंदू अन्य पक्ष्यांच्या तुलनेत मोठा असतो. तो प्राणी पक्षी यांचे आवाज, माणसाचे बोल काढू शकतो. टवटवीत रंगाचे अंग, पंख आणि चोच असणारा पक्षी. चोच टणक आणि वक्राकार असते. पोपट थव्याने राहतात. फळे, भाज्या, बिया, धान्य असा शाकाहार करतात. थव्याने वावरतात. पोपटांची धाड बागेवर, शेतावर पडली की माणसे हवालदिल होतात. 

पोपट फळ पूर्णपणे खात नाहीत. बर्‍याच वेळा वटवाघळांप्रमाणे फांदीला उलटे टांगून फळे खातात. कधी पायाच्या पकडीत धरून फळे खातात. पोपटांच्या फळे खाण्याच्या या पद्धतीचा फायदा किडे, मुंग्या, सूक्ष्मजीव यांना होतो. पोपटांच्या विष्टेवाटे बारीक बियांची फळे असणाऱ्या झाडांचा बीजप्रसार होतो. पोपटाच्या चोचीमुळे ते कठीण कवचाची फळेही फोडू शकतात.

पोपट मोठ्या बिया चोचीतून दूरवर घेऊन जातात. 25 ते 1200 मीटर बीजप्रसार करू शकतात. त्यांची उगवणक्षमता 30% असते. पोपटाला आपपरभाव नसतो त्यामुळे माणसाला पोपटांच्या थव्यांमुळे नुकसान होते. पण अनेक फळझाडांना आणि किडामुंग्यांना अन्न मिळते.

एकमेका सहाय्य करू...

खातो जितके त्यापेक्षा अधिक उधळतो 

इतरांसाठी पोपट झाडांवरची फळे पाडतो

छोट्या बिया विष्टेवाटे दूरवर पसरतो.

मोठ्या बिया चोचीतून वाहून नेतो

माणसे जरी होती हवालदिल त्याच्या धाडीने

फळझाडे मनोमन आनंदती त्याच्या करणीने

- विनय रमा रघुनाथ  

0 Response to "एकमेका सहाय्य करू १: पोपट आणि फळझाडे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article