एकमेका सहाय्य करू ३: दलदली बेडूक आणि अँटोलियन म्हशी
झ्डुनिॲक यांनी तुर्कस्तानातील दलदली बेडकांचा (Pelophylax ridibundus) अभ्यास केला. हे बेडूक सुमारे 10 सेंटिमीटर लांब आणि मोठ्या जबड्यांचे असतात. मादी नरापेक्षा मोठी असते. तर पिल्ले बेडूकमासा किंवा भैकेर स्थितीत सडपातळ आणि शेपटीसह 19 सेंटिमीटर पर्यंत लांब असतात.
प्रौढ बेडूक किडे खातात, तर पिल्ले शाकाहार करतात. कडक हिवाळ्यात दलदली बेडूक दीर्घ काळासाठी निद्राधीन होतात. दलदली बेडूक आणि पाणथळ जागेत वावरणाऱ्या अँटोलियन म्हशी (Bubalus bubalis) यांच्यात एक वेगळे नाते दिसून येते. हिवाळी निद्रा घेण्याआधी बेडूक अँटोलियन म्हशींच्या अंगावर उड्या मारून बसतात.
एका म्हशीवर सर्वाधिक 31 बेडूक संशोधकांना आढळले. या म्हशींच्या अंगभर भरपूर केस असतात. त्यात रहाणार्या बेडकांना मस्त उबदार जागा मिळते. शिवाय म्हशीच्या केसांखालील पिसवा, किडे खायला मिळतात. पिसवांमुळे चिडचिड झालेल्या म्हशीची ते सुटका करतात.
बेडकांचे पोट भरले की ते म्हशीवरून उतरून चिखलात जाऊन हिवाळी झोपेच्या अधीन होतात.
एकमेका सहाय्य करू...
दिसले त्यांना तुर्कस्तानी कैक बेडूक दलदली
बसले केसांवरी म्हशींच्या रमणाऱ्या जळथळी
देत बेडकां ऊब वरी अन् पिसवांची खाद्यथाळी
ते म्हशीला शांतून जाती घेण्या झोप हिवाळी
- विनय रमा रघुनाथ
0 Response to " एकमेका सहाय्य करू ३: दलदली बेडूक आणि अँटोलियन म्हशी"
Post a Comment