VIDEO: पुण्यातील जगप्रसिद्ध उलटा धबधबा! इथं पाणी उंचावरुन खाली नाही तर आकाशाकडे उडते

VIDEO: पुण्यातील जगप्रसिद्ध उलटा धबधबा! इथं पाणी उंचावरुन खाली नाही तर आकाशाकडे उडते


महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. निसर्गाचं अनोखं रूप आता पाहायला मिळत आहे. वर्षाविहाराचा आनंद घेण्याठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. या पृथ्वीवर अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, ज्यांचा शोध आजपर्यंत मानव घेऊ शकला नाही. ज्यांचा शोध लागला आहे, त्यांची रहस्ये माणसाला नेहमीच गुंतवून ठेवतात. भारतातही अशी अनेक ठिकाणे आहेत, जी लोकांच्या कुतुहलाचा विषय आहेत. महाराष्ट्रातील नाणेघाटाचा उलटा धबधबा हे देखील असेच एक रहस्यमय ठिकाण आहे.

नाणेघाट हे पुण्यातील जुन्नरजवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आहे. हे मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर आहे. उलटा धबधब्यासाठी हा घाट जगभर प्रसिद्ध आहे. त्याचे सौंदर्य विशेषतः पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. उलटा धबधबा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात.

हा धबधबा न्यूटनच्या नियमांना आव्हान देतो

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार, वरुन पडणारी कोणतीही गोष्ट सरळ खाली पडते. धबधब्यांचेही असेच आहे. पण नाणेघाटच्या धबधब्याचे स्वतःचे नियम आहेत. वास्तविक हा धबधबा घाटाच्या उंचीवरून खाली येण्याऐवजी वर येतो. होय, याच कारणामुळे या धबधब्याला उलटा धबधबा म्हणतात.

असे का होते?



त्याच्या वैशिष्ट्यामुळे हा धबधबा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण हा धबधबा खाली पडण्याऐवजी वर कसा होतो, हा प्रश्न सर्वांच्या मनात कायम आहे. शास्त्रज्ञांच्या मते, यामागचे कारण म्हणजे वार्‍याची तीव्र शक्ती जी वाहत्या पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. वास्तविक नाणेघाटात वारे खूप वेगाने वाहतात. त्यामुळे धबधबा खाली पडला की वाऱ्यामुळे उडतो.

नाणेघाट ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध

तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर नाणेघाट हे तुमच्यासाठी सर्वात योग्य ठिकाण आहे. नाणेघाट ट्रॅक हा घाटघर जंगलाचा एक भाग आहे, जो मुंबईपासून 120 किमी आणि पुण्यापासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. कल्याण-अहमदनगर महामार्ग आणि कल्याण येथून ट्रेकर्सनाही या ठिकाणी पोहोचता येते. हा 4 ते 5 किमी लांबीचा ट्रॅक दोन्ही बाजूंनी ओलांडण्यासाठी 5 तास लागू शकतात. डोंगराच्या माथ्यावर वाहनांनीही जाता येते. त्यासाठी पर्यायी मार्गही तयार करण्यात आला आहे.

0 Response to "VIDEO: पुण्यातील जगप्रसिद्ध उलटा धबधबा! इथं पाणी उंचावरुन खाली नाही तर आकाशाकडे उडते"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article